सहा विद्यार्थिनींमध्ये सतत रडणे, भीती, उदासपणा, विस्मरण आणि शारीरिक तक्रारी अशी लक्षणे आढळून आली. यानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य पथकाने तपासणी केली. या तपासणीत या विद्यार्थिनींमध्ये Dissociative Conversion Disorder असल्याचे निदान करण्यात आले. मानसिक तणाव, अभ्यासाचा ताण आणि घटनांचा परिणाम यामागे कारणीभूत असण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. विद्यार्थिनींना स्वतंत्र ठेवून उपचार तसेच पालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
#students #amravati #amravatinews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment